• +91 9730037510, 7709937510
  • कोडोली अर्बन बँकेच्या समोर मेन रोड कोडोली

Rules & Terms (नियम व अटी)

  1. आमच्या विवाह संस्थेत सर्व जाती धर्माचे विवाह इच्छुक वधू वराची नाव नोंदणी होते.
  2. नाव नोंदणी नंतर स्थळाचा प्रोफाईल वेबसाईटवर अपलोड केला जातो आणि आपणास वेबसाईटचा एक आयडी, पासवर्ड दिला जातो. आणि स्थळा साठी विवाह संस्थेशी संपर्क करावा.
  3. नाव नोंदणी करणाऱ्याने आपल्या स्थळाची माहिती खरी द्यावी, ही त्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे, यात काही असत्य असल्यास त्याची सर्व कायदेशीर जबाबदारी नाव नोंदणी करणाऱ्याची राहील.
  4. सभासदाने पसंत असलेल्या स्थळाशी संपर्क स्वतः करावा, व स्थळाच्या माहितीची खातरजमा करूनच घ्यावी व नंतर भावी आयुष्याचा निर्णय घ्यावा.
  5. संस्थेतर्फे किंवा स्वतःच्या प्रयत्नाने जुळून आल्यास त्या संबंधीची माहिती विनाविलंब संस्थेस कळवावी.
  6. नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात जमेल, याची हमी आम्ही देत नाही.
  7. वधू वर केंद्रातील माहितीचा अगर फोटोचा कोणीही गैरवापर करू नये, केल्यास त्याचे सभासदत्व कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केले जाईल.
  8. विवाह जुळल्यानंतर भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास संस्था, संस्थेची कोणतीही शाखा अगर संचालक जबाबदार राहणार नाही.
  9. नाव नोंदणी नंतर सभासदाने कोणत्याही शाखेशी अगर हेड ऑफिसशी माझे पुढे काय झाले, म्हणून सतत फोन करून त्रास देऊ नये, कारण तुमच्या इतकेच इतर ही सभासद संस्थेस तितकेच महत्वाचे आहेत. तुम्हाला आम्ही नवीन स्थळाबद्दल माहिती अपडेट करत राहू.
  10. वरील प्रमाणे सर्व अटी मान्य असणाऱ्यांचीच नाव नोंद करावे, कोणत्याही सबबीवर एकदा भरलेली फी परत मिळणार नाही.
  11. विवाह अक्षता (संपूर्ण मध्यस्थी ) या प्लॅन साठी हेड ऑफिस मध्ये संपर्क करावा.
आदर्श विवाह संस्था
WhatsApp HELP